Join us  

माधूरीच्या आयकॉनिक गाण्याचा रिमेक, 'मेरा पिया घर आया २.०' मध्ये सनी लिओनीचे ठुमके; टीझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 2:03 PM

'मेरा पिया घर आया २.०' या गाण्यातून सनी चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

बॉलिवूड प्रेक्षकांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी अभिनेत्री सनी लिओनी आज चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. सनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता 'मेरा पिया घर आया २.०' या गाण्यातून सनी चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

सनी लिओनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'मेरा पिया घर आया २.०' गाण्याचा टीझर शेअर केला. कॅप्शनमध्ये सनीने लिहिले, 'हे गाणे शेअर करताना खूप अभिमान वाटतोय! माधुरी दीक्षितच्या गाण्याचा रिमेक करणे, हे माझ्यासाठी एक मोठा सन्मान आहे'. रीलिझनंतर काही क्षणातच चाहत्यांना या टीझरला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.  

धकधक गर्ल माधूरी दीक्षितचा 'याराना' हा चित्रपट 1995 साली प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शक डेविड धवन यांच्या चित्रपटातील 'मेरा पिया घर आया' हे गाणे खूप लोकप्रिय झालं होतं. ज्यामध्ये माधुरीने तिच्या अप्रतिम नृत्याने खळबळ उडवून दिली होती. आजही माधुरीचे हे आयकॉनिक गाणे खूप पसंत केले जाते.  आता तब्बल २८ वर्षांनंतर सनी लिओनी 'मेरा पिया घर आया'चा रिमेक घेऊन येत आहे 

सनी लिओनीचे नाव बॉलिवूड चित्रपटांमध्ये आयटम नंबरसाठी प्रसिद्ध आहे. इतकेच नाही तर सनीने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही तिची जादू पसरवली आहे.  सनी लिओनीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच अनुराग कश्यप दिग्दर्शित 'केनेडी'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा प्रीमियर अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये झाला आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र, हा चित्रपट अद्याप चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला नाही. सनी लिओन आणि राहुल भट्ट स्टारर चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.  

टॅग्स :सनी लिओनीबॉलिवूडमाधुरी दिक्षित