Join us
Daily Top 2Weekly Top 5

 सनी लिओनी ठरली वरचढ, शाहरूख-सलमानसह मोदींनाही टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 14:28 IST

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर किती अ‍ॅक्टिव्ह आहे, हे सांगणे नकोच. स्वत:चे रोज नवे फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करते. तिच्या याच अदांमुळे फॅन फॉलोर्इंगच्या बाबतीत ती बॉलिवूडच्या सुपरस्टार्सला टक्कर देते.

ठळक मुद्देगतवर्षीही भारतात सर्वाधिक सर्च झालेल्या व्यक्तिंमध्ये सनीचे नाव होते. लवकरच सनी एका मल्याळम चित्रपटातही  झळकणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर किती अ‍ॅक्टिव्ह आहे, हे सांगणे नकोच. स्वत:चे रोज नवे फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करते. तिच्या याच अदांमुळे फॅन फॉलोर्इंगच्या बाबतीत ती बॉलिवूडच्या सुपरस्टार्सला टक्कर देते. ऐकून आश्चर्य वाटेल पण सनीने लोकप्रियतेच्या बाबतीत सलमान खान, शाहरूख खान इतकेच काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मागे टाकले आहे. भारतात गुगलच्या ‘मोस्ट सर्च्ड सेलिब्रिटी’च्या यादीत सनीचे नाव आघाडीवर आहे.

यंदा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च झालेल्या व्यक्तिंच्या यादीत सनी लिओनी टॉपवर आहे. या यादीत तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाहरूख खान, सलमान खान अशा अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे. प्राप्त माहितीनुसार, गुगलवर सनीशी संबंधित व्हिडीओ सर्वाधिक सर्च केले गेलेत. याशिवाय तिची बायोपिक सीरिज ‘करणजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ सुद्धा सर्च केली गेली. सनी लिओनीला सर्च करणा-या राज्यांत मणिपूर आणि आसाम ही राज्ये सर्वात पुढे आहेत.

सनीने यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चाहत्यांचे आभार मानले आहेत. माझ्या टीमने मला याबद्दल माहिती दिली. याचे संपूर्ण श्रेय मी माझ्या चाहत्यांना देईल. ही एक समाधानकार भावना आहे, असे तिने म्हटले आहे.

गतवर्षीही भारतात सर्वाधिक सर्च झालेल्या व्यक्तिंमध्ये सनीचे नाव होते. लवकरच सनी एका मल्याळम चित्रपटातही  झळकणार आहे. ‘रंगीला’ या  चित्रपटातून ती मल्याळम चित्रपटसृष्टीत पर्दापण करतेय. ‘कोका कोला’नामक कॉमेडी चित्रपटातही सनीची वर्णी लागली आहे.

टॅग्स :सनी लिओनीनरेंद्र मोदीशाहरुख खान