ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान व अनुष्का शर्मा यांची मुख्य भूमिका असणा-या 'सुलतान' या चित्रपटाबद्दल त्यांच्या चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. या चित्रपटाची खूप हवा करण्यात येत असली तरी या चित्रपटाचे म्युझिक मात्र फारास गाजावाज न करता लाँच करण्यात आले. सलमानने आज सोशल मीडियावर या चित्रपटाचे ' बेबी को बेस पसंद है ' हे पहिले गाणे रिलीज केले. त्याला अवघ्या काही तासांतच हजारो लाईक्स मिळाले. लग्नसोहळ्यादरम्यान चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्यात सलमान व अनुष्का एकत्र थिरकताना दिसत आहेत.
या गाण्याच्या रिलीजनंतर अवघ्या काही वेळातच चित्रपटातील इतर गाणीही सोशल मीडियावरच लाँच करण्यात आली. या चित्रपटात एकूण नऊ गाणी आहेत.
दरम्यान 'सुलतान' चित्रपटातील आपले गाणे काढू नये अशी मागणी करत गायक अरिजित सिंगने त्याच्या व सलमानच्या वादाबद्दल पोस्ट लिहीली होती. मात्र सलमानने त्याबद्दल काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र या वादानंतरच 'सुलतान'ची गाणी फारशी गाजावाजा न करता ऑनलाईन लाँच करण्यात आली असावीत अशी चर्चा सुरू आहे.