Join us  

सुखविंदर सिंग कुल्फीकुमार बाजेवालाच्या टीमला देणार ही भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 3:51 PM

‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या मालिकेतील एका प्रोमोमध्ये प्रेक्षकांना महान गायक सुखविंदर सिंगला पाहायला मिळणार आहे. त्याने नुकतेच या मालिकेसाठी चित्रीकरण केले. या मालिकेसाठी चित्रीकरण करण्याचा त्याचा अनुभव खूपच चांगला होता.

‘स्टार प्लस’वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या मालिकेची कथा अनोखी असल्याने ही मालिका आणि या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत आकृती शर्मा (कुल्फी), मोहित मलिक (सिकंदरसिंह गिल), अंजली आनंद (लव्हली) या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. या कलाकारांच्या अप्रतिम अभिनयामुळे ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे.

‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या मालिकेतील एका प्रोमोमध्ये प्रेक्षकांना महान गायक सुखविंदर सिंगला पाहायला मिळणार आहे. त्याने नुकतेच या मालिकेसाठी चित्रीकरण केले. या मालिकेसाठी चित्रीकरण करण्याचा त्याचा अनुभव खूपच चांगला होता. या मालिकेच्या प्रोमोच्या चित्रीकरणाच्या वेळी सुखविंदर सिंगने सांगितले की, त्याला या मालिकेला एक गाणे स्वत:च्या आवाजात ध्वनिमुद्रित करून भेट म्हणून द्यायचे आहे.

या मालिकेत सिकंदरसिंग गिल या रॉकस्टारची भूमिका साकारणाऱ्या मोहित मलिकला सुखविंदर सिंगची भेट घेतल्यावर प्रचंड आनंद झाला. कारण तो या मालिकेचा फार मोठा चाहता आहे. यावेळी त्याने सुखविंदर सिंगकडून गाताना कशा तऱ्हेने हावभाव केले पाहिजेत, देहबोली कशी असली पाहिजे याच्या काही टिप्स घेतल्या. चित्रीकरणाच्या वेळी या दोघांमध्ये बऱ्याच गप्पा रंगल्या होत्या. यावेळी मोहित मलिकने आपण सुखविंदरसिंगच्या आवाजाचे आणि गाण्यांचे चाहते आहोत, असे त्याला सांगितले. याविषयी मोहित सांगतो, “सुखी पाजी यांना भेटल्यामुळे मी प्रचंड आनंदित झालो होतो. ते अगदी नम्र स्वभावाचे असून त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. मी जेव्हा त्यांना या मालिकेची संकल्पना सांगितली की, ज्यात बाप आणि मुलगी एकत्रच राहात असले, तरी त्यांना आपलं काय नातं आहे, ते ठाऊक नाही, हे ऐकून सुखी पाजी यांना आश्चर्याचा धक्काच बसला!” याविषयी सुखविंदर म्हणाला, “या मालिकेची कथा ऐकल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला आणि आता मला सिकंदर आणि कुल्फी यांना एक गाणं माझ्या आवाजात ध्वनिमुद्रित करून द्यायचं आहे. ते गाणंही मीच लिहीन. हे गाणे मी लवकरच या मालिकेच्या टीमला भेट म्हणून देणार आहे.” 

टॅग्स :कुल्फी कुमार बाजेवाला