Join us

सुहानाने केली कॅटची ‘कॉपी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 15:56 IST

सध्या जान्हवी कपूर आणि सारा अली खान या दोघींच्या नावाप्रमाणे आणखी एका स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे

सध्या जान्हवी कपूर आणि सारा अली खान या दोघींच्या नावाप्रमाणे आणखी एका स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ती स्टार किड म्हणजे किंग खान शाहरूखची मुलगी सुहाना खान. सध्या ती वेगवेगळ्या कारणांमुळे सुहाना चर्चेत आली आहे. तेही तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे. काही दिवसांपूर्वीच गौरी खानने डिझाईन केलेल्या रेस्टॉरंट लाँचच्यावेळी सुहानाचा अंदाज पाहून कॅमेऱ्यांसह उपस्थितांचीही नजर तिच्यावरून हटत नव्हती. आता आणखी एका फोटोमुळे सुहाना ही कॉपी कॅट असल्याचेही बोलले जात आहे. कॅटरिना कैफने एका कार्यक्रमात सुहानाप्रमाणेच आॅरेंज कलरचा वनपीस घातला होता. कॅटरिनाचा हा फोटो पाहताच सुहाना कॅटरिनाची फॅशन फॉलो करत असल्याचे बोलले जात आहे. लाँचिंगवेळी सुहानाने घातलेला ड्रेस हा कॅटरिनाच्या ड्रेसची कॉपी केल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे सुहानाने घातलेल्या ड्रेसच्या किं मतीचीही चर्चा होत आहे. या ड्रेसची किंमत जवळपास ६०,००० रु. इतकी असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे बॉलिवूड पदार्पणापूर्वीच सुहाना प्रकाशझोतात आली आहे.