Join us

आरोह करणार स्ट्रगल

By admin | Updated: October 12, 2016 03:32 IST

‘घंटा’ या चित्रपटात अभिनेता आरोह वेलणकर हा हटक्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी आरोह ‘रेगे’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र

‘घंटा’ या चित्रपटात अभिनेता आरोह वेलणकर हा हटक्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी आरोह ‘रेगे’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र आरोहने रेगे चित्रपटात साकारलेल्या भूमिकेपेक्षा घंटा या चित्रपटातील त्याची भूमिका वेगळी आहे. त्याच्या या भूमिकेविषयी ‘लोकमत सीएनएक्स’ला आरोह सांगतो, ‘‘रेगे या चित्रपटात मी कॉलेज गोईंग मुलांची भूमिका साकारली होती. पण घंटा या चित्रपटात मी कॉलेज गोईंगपेक्षा ही थोड्या वयाने जास्त असणाऱ्या तरुणाची भूमिका साकारली आहे. या तरुणाला मुंबईमध्ये सेटल होण्याचे वेड लागलेले असते. त्याला आपले करिअर सेट करायचे असते. त्यामुळे या चित्रपटात मी स्ट्रगल करताना पाहायला मिळणार आहे. एक जबाबदार आणि आयुष्याकडे गांभीर्याने बघणारा मुलगा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे घंटा हा केवळ विनोदी चित्रपट नसून त्याच्या माध्यमातून आम्ही एक चांगला संदेश देण्याचादेखील प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांचे आवडते कलाकार अमेय आणि सक्षमदेखील या चित्रपटात दिसणार आहेत. आमच्या तिघांची केमिस्ट्री या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.