Join us

स्पृहा-उमेशचे ‘डोण्ट वरी बी हॅपी’

By admin | Updated: December 17, 2015 01:42 IST

एका लग्नाची गोष्ट या नाटकासहित चित्रपटातूनदेखील स्पृहा जोशी व उमेश कामत या जोडीने संपूर्ण महाराष्ट्रात धमाल उडवली होती. ही जोडी प्रथमच रंगमंचावर येत आहे, हे सर्वश्रुत

एका लग्नाची गोष्ट या नाटकासहित चित्रपटातूनदेखील स्पृहा जोशी व उमेश कामत या जोडीने संपूर्ण महाराष्ट्रात धमाल उडवली होती. ही जोडी प्रथमच रंगमंचावर येत आहे, हे सर्वश्रुत आहेच! पण, या नवीन नाटकाचे नाव काय असावे, यासाठी संपूर्ण टीमने सोशल वेबसाइटवर ‘वरी बी परफेक्ट हॅपी मॅच डोण्ट मिस’ असे टाकून, यातील सोनल प्रॉडक्शनच्या दोन नवीन नाटकांचे नाव ओळखा व प्रिमिअर शोचे पासेस मिळवा, अशा पद्धतीचा नाटकाचा प्रमोशन फंडा वापरला होता. पण, प्रेक्षकांनी अचूक नाव ओळखले. यातील उमेश कामत व स्पृहा जोशी या जोडीच्या नाटकाचे नाव ‘डोण्ट वरी बी हॅपी’ असे निश्चित झाले आहे, हे नक्की.