Join us  

कविता खास तुझ्यासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2016 2:29 AM

जितेंद्र जोशी एक चांगला अभिनेता असण्यासोबतच उत्तम कवी आहे. आता जितेंद्रने रेवा या ६ वर्षांच्या त्याच्या मुलीसाठी एक कविता लिहिली आहे. कभी हथेली में समा जाती थी

जितेंद्र जोशी एक चांगला अभिनेता असण्यासोबतच उत्तम कवी आहे. आता जितेंद्रने रेवा या ६ वर्षांच्या त्याच्या मुलीसाठी एक कविता लिहिली आहे. कभी हथेली में समा जाती थी जो ,आज आँखों में भी समाती नहीं, मासूम सा मौसम होती हैं बेटियाँ, बरसेंगी भी और बदल भी जाएँगी.... जितेंद्रची ही कविता खरंच मनाला भिडणारी आहे. या कवितेतून त्याने आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलींना नेहमीच समाजात दुय्यम मान दिला जातो. मुलांप्रमाणे मुली प्रगती करू शकत नाहीत किंवा त्यांना संरक्षणासाठी कोणाची तरी गरज लागते असा समज असतो. परंतु जितेंद्रने असा विचार करणाऱ्या समाजाला या कवितेतून एक संदेश दिला आहे. या कवितेला त्याच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर अनेक लाइक्स मिळत आहेत.