Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभू (samantha ruth prabhu) ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे जगभरात लाखो चाहते आहेत. पुष्पा-२ द राईज चित्रपटातील ऊ अंटावा हे गाण्यामुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. हे गाण्यामधीन प्रत्येक डान्स स्टेप्सने प्रेक्षकांना घायाळ केलं होतं. दरम्यान, या गाण्यातीसल अल्लू अर्जुनची आणि समंथाची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडल होती. २०२१ मध्ये आलेल्या या गाण्याने अनेकांना भूरळ घातली होती. दरम्यान, या गाण्यासाठी समांथाला खूप मेहनत घ्यावी लागली. अलिकडेच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने शूटिंगशी संबंधित तिचा अनुभव शेअर केला आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये समांथाने ऊ अंटावा गाण्याच्या शूटिंगचा खास किस्सा शेअर केला. त्यादरम्यान अभिनेत्री म्हणाली, "मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही स्वतःला एक हॉट मुलगी मानलं नाही. पण जेव्हा मला 'पुष्पा' चित्रपटातील 'ऊ अंटावा' या आयटम साँगची ऑफर मिळाली तेव्हा मला वाटले की हो, मी अशी दिसू शकते. खरं तर, मी अशा डान्स नंबर्ससाठी कधीही काम केलं नव्हतं. हे गाणं माझ्यासाठी एक आव्हान होतं."
त्यानंतर समंथा म्हणाली, " गाण्याची गरज म्हणून मला खरंच त्यामध्ये हॉट दिसणं गरजेचं होत. कारण याआधी चित्रपटांमध्ये नेहमीच गोंडस, चुलबुली मुलगी अशा भूमिका साकारल्या आहेत. पण, हे आयटम सॉंग वेगळं होतं, त्यामध्ये मी पूर्णपणे वेगळी दिसत होते. पण, हे गाण्याच्या शूटिंगवेळी मी खूप घाबरले होते. शूटपूर्वी मी ५०० कलाकारांसमोर थरथर कापत होते." असा खुलासा अभिनेत्रीने केला.
अभिनेत्री समांथाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या वर्षी ती 'सिटाडेल हनी बनी' या वेब सिरीजमध्ये दिसली होती. ज्यामध्ये वरुण धवन देखील मुख्य भूमिकेत होता. लवकरच ती 'रक्त ब्रह्मांड' ही वेब सिरीजद्वारे प्रेक्षकांचं मनोरंज करण्यास सज्ज झाली आहे.