Join us

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा रुग्णालयात दाखल, 'किंगडम'च्या रिलीजपूर्वी तब्येत बिघडली, नक्की झालं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 09:10 IST

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा रुग्णालयात दाखल; 'या' कारणामुळे बिघडली तब्येत

Vijay Deverakonda : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता, सुपरस्टार विजय देवरकोंडाची (Vijay Deverakonda) तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिनेत्याला डेंग्यू झाला असून त्याला ताप देखील आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात अॅडमिट करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. 

सध्या विजय देवरकोंडा त्याचा आगामी बिग बजेट चित्रपट 'किंगडम' मुळे चर्चेत आहे. असं असताना एकीकडे त्याचे चाहते त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे, त्यात आता अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट चाहत्यांची चिंता वाढली आहे. याच कारणामुळे अलिकडेच पार पडलेल्या 'किंगडम' सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्येही विजय देवरकोंडा सहभागी झाला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्याला तीव्र ताप आणि अशक्तपणा येत होता, त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, याबाबत विजय देवेराकोंडा किंवा त्यांच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, 'किंगडम' हा बिग बजेट चित्रपट येत्या ३१ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विजय देवरकोंडाचा हा बहुचर्चित चित्रपट तमिळ, हिंदी आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. 'किंगडम'चे दिग्दर्शन गौतम टिन्ननुरी यांनी केलं आहे. तसेच सितारा एंटरटेनमेंटची निर्मिती आहे. या चित्रपटाचे दोन भाग असणार आहेत. पण दोन्ही भागाचं कथानक पूर्णपणे वेगळं असणार आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडासोबत अभिनेत्री भाग्यश्री बोरसे स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 

टॅग्स :विजय देवरकोंडासेलिब्रिटीडेंग्यू