Join us  

रश्मिका मंदानाने 'पुष्पा २'च्या सेटवरील शेअर केला फोटो, झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 2:09 PM

'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2 : The Rule) हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.

'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2 : The Rule) हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. त्याच वेळी अल्लू अर्जुनने देखील शेअर केले होते की हा चित्रपट त्याच्या पहिल्या भागापेक्षा मोठा असणार आहे, ज्यामुळे लोकांची उत्सुकता आणखी वाढली. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे आणि दरम्यान, आता अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने सेटवरील एक नवीन फोटो शेअर केला आहे.

'पुष्पा २: द रुल'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने चित्रपटाच्या सेटवरून चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांचा एक फोटो शेअर केला आहे. रश्मिका मंदानाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत दिग्दर्शक सुकुमार सिंहाच्या पुतळ्याजवळ उभे असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना रश्मिकाने कॅप्शन दिले की, "सुकुमार खुलेपणाने पोज देताना #Pushpatherule.

सध्या सुरू आहे 'पुष्पा २: द रुल'चं शूटिंग'पुष्पा २: द रुल' चित्रपटाचे शूटिंग वेगाने सुरू आहे. 'पुष्पा २: द रुल' हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुनने इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या पोस्टर शेअर करुन अधिकृत माहिती दिली आहे.

'पुष्पा : द राइज'ला मिळाला दमदार प्रतिसाद  'पुष्पा: द राइज' या चित्रपटाच्या रेकॉर्डब्रेक यशानंतर, राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता अल्लू अर्जुन सुकुमार दिग्दर्शित चित्रपटाच्या या सिक्वेलमध्ये पुनरागमन करत आहे. सिक्वेलमध्ये रश्मिका मंदाना आणि फहद फासिल देखील दिसणार आहेत.

'पुष्पा: द राइज'ने जिंकले २ राष्ट्रीय पुरस्कार 'पुष्पा २: द रुल' या चित्रपटात पुष्पराज आणि भंवर सिंग शेखावत (फहद फासिल) यांच्यात संघर्ष होणार आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेता (अल्लू अर्जुन) आणि सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (देवी श्री प्रसाद) या विभागांमध्ये दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. मैत्री मुव्ही मेकर्स आणि सुकुमार राइटिंग्स निर्मित, 'पुष्पा'ला देवी श्री प्रसाद यांनी संगीत दिले आहे. छायाचित्रण मिरोस्लाव कुबा ब्रोजेक यांचे आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे एडिटिंग कार्तिक श्रीनिवास आणि रुबेन यांनी केले आहे.

टॅग्स :रश्मिका मंदानाअल्लू अर्जुनपुष्पा