Join us

प्रियंका च्रोपा आणि महेश बाबूच्या 'SSMB29'ची रिलीज डेट समोर आली, कधी होणार प्रदर्शित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 11:35 IST

राजामौली यांचा 'बाहुबली' आणि 'आरआरआर'नंतरचा हा मोठा प्रोजेक्ट आहे.

लोकप्रिय दिग्दर्शक एस.एस. राजमौली (S. S. Rajamouli) यांचा प्रत्येक चित्रपट हा इतिहास रचतो.   जगभरात लोकप्रिय ठरलेल्याबाहुबली: द बिगिनिंग (२०१५), बाहुबली 2: द कन्क्लूजन (२०१७) आणि RRR (२०२२) या चित्रपटाची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये आहे. आता लवकच ते दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू आणि 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट घेऊन येत आहेत. 'SSMB29' असं या चित्रपटाचं नाव आहे. महेश आणि प्रियंकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाच्या रीलिज डेटबद्दल मोठं अपडेट समोर आलं आहे. 

 एस.एस. राजमौली यांचा 'SSMB29' चित्रपट २७ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जातं आहे. मात्र, अद्याप निर्मात्यांकडून अधिकृत घोषणाही झालेली नाही. त्यामुळे सध्या ही तारीख चर्चेत आहे. हा एक ग्लोबल अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्शन फिल्म असणार आहे. एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली' आणि 'RRR'सारख्या ब्लॉकबस्टरनंतरचा हा प्रोजेक्ट असल्याने, प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार, या सिनेमात महेश बाबू एका धमाकेदार डान्स नंबरमध्ये थिरकताना दिसणार आहे. 'गुंटूर करम' चित्रपटातील 'कुर्ची मदतापेट्टी' गाण्यानंतर महेश बाबूचा हा आणखी एक डान्स प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. तर प्रियंका चोप्रा ही बऱ्याच वर्षानंतर भारतीय फिल्म इंडस्ट्रीत कमबॅक करणार असल्याचे तिचे चाहते खुश आहेत. 

टॅग्स :प्रियंका चोप्रामहेश बाबूएस.एस. राजमौली