Join us  

प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' संदर्भात नवीन माहिती, निर्मात्यांनी घेतला हा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 1:34 PM

बाहुबली फेम अभिनेता प्रभासचा अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट 'कल्कि 2898 एडी' (Kalki 2898 AD)चा चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात प्रभास वेगवेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे.

बाहुबली फेम अभिनेता प्रभासचा अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट 'कल्कि 2898 एडी' (Kalki 2898 AD)चा चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात प्रभास वेगवेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. सालार चित्रपटाच्या हिटनंतर प्रभासचा साई फाई चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट जानेवारीत रिलीज होणार होता. मात्र आता प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कल्कि 2898 एडी जानेवारी महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नाही. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

 'कल्कि 2898 एडी' चित्रपटाची रिलीज डेट जानेवारी महिन्यात जाहीर केली होती. पण आता टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाची रिलीज डेट पोस्टपोन करण्यात आली आहे आणि यामागचं कारण प्रभास आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रभासने नुकत्याच रिलीज झालेल्या सालारच्या हिटनंतर ते बदलण्यास सांगितले आहे. कारण त्याला वाटते की जर सालार आणि कल्कीच्या रिलीजमध्ये फारसा फरक नसेल तर त्याच्या यशावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे निर्माते आता चित्रपटाच्या रिलीजची नवीन तारीख शोधत आहेत. रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट आता मार्च किंवा एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे.

प्रॉडक्शन टीमला कल्की 2898 एडी कडून खूप आशा आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल आणि हिट होईल, अशी त्याला आशा आहे. प्रभासही या चित्रपटाद्वारे नवे विक्रम रचण्यासाठी सज्ज झाला आहे. कल्की 2898 AD चे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. या चित्रपटात प्रभाससोबत कमल हासन, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्रभास सध्या सालारच्या यशाचा आनंद घेत आहे. तर दीपिका पादुकोणचा फायटर हा चित्रपट २६ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

टॅग्स :प्रभासअमिताभ बच्चनदीपिका पादुकोण