Join us  

साखरपुड्याच्या चर्चांदरम्यान रश्मिका-विजय देवराकोंडाचं व्हिएतनाममध्ये व्हॅकेशन? फोटोंमुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 11:20 AM

रश्मिका आणि विजयचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंवरुन रश्मिका आणि विजय व्हिएतनाममध्ये एकत्र व्हॅकेशन साजरा करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

गेल्या अनेक दिवसांपासून रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडाच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. रश्मिका आणि विजय साखरपुडा करणार असल्याच्याही चर्चा होत्या. यादरम्यानच आता रश्मिका आणि विजयचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंवरुन रश्मिका आणि विजय व्हिएतनाममध्ये एकत्र व्हॅकेशन साजरा करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

काही दिवसांपूर्वी विजयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हॅकेशन ट्रिपचे फोटो शेअर केले होते. यामध्ये तो स्ट्रीट फूड खाताना दिसत होता. "जेव्हा तुम्हाला हास्याचा अटॅक येतो", असं कॅप्शन त्याने फोटोला दिलं होतं. त्याच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या होत्या.

थोड्या दिवसांनी रश्मिकाचे फोटो येतील, हे फोटोही रश्मिकानेच काढले असतील, अशा आशयाच्या कमेंट चाहत्यांनी केल्या होत्या. विजयनंतर आता रश्मिकानेही फोटो शेअर केले आहेत. 

रश्मिकानेही तिच्या सोशल मीडियावरुन काही फोटो शेअर केले आहेत.  यामध्ये तिने डोक्यावर हॅट घातल्याचं दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून रश्मिका आणि विजय एकाच ठिकाणी व्हॅकेशनला गेले असल्याचं चाहते म्हणत आहेत.

रश्मिकाचे फोटो विजयने काढल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. एका फॅन पेजवरुन त्यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये रश्मिकाच्या गॉगलमध्ये फोटो काढणाऱ्याचा फोन दिसत आहे. तो मोबाईल फोन विजयचा असल्याचं चाहते म्हणत आहेत.  

टॅग्स :रश्मिका मंदानाविजय देवरकोंडासेलिब्रिटी