Join us  

Allu Arjun: अल्लू अर्जुनचे या सिनेमानंतर बदललं आयुष्य, म्हणाला - "हा फक्त चित्रपट नाही तर...."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 11:55 AM

Allu Arjun: साऊथचा स्टायलिश सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २ द रुल' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन या चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो.

साऊथचा स्टायलिश सुपरस्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा 'पुष्पा २ द रुल' (Pushpa 2) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन या चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेटवर प्रेक्षक लक्ष ठेवून असतात. २००३ मध्ये 'गंगोत्री' चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.

अल्लू अर्जुनचा रोमँटिक ड्रामा चित्रपट 'आर्या' रिलीजला नुकतेच २० वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट सुकुमार यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी दिल राजूने घेतली. 'आर्या' हा अल्लूच्या कारकिर्दीतील अशा चित्रपटांपैकी एक आहे जो अभिनेत्याच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. अल्लूने या चित्रपटासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

अल्लू अर्जुनसाठी 'आर्या' आहे खासअल्लू अर्जुनने नुकतेच ट्विटर म्हणजेच एक्स अकाउंटवर लिहिले की, आर्याला २० वर्ष पूर्ण झालीत. हा फक्त एक सिनेमा नाही. माझ्या जीवनातील महत्त्वाचा वेळ ज्याने माझ्या जीवनाचे तत्व बदलून टाकले. नेहमीच मी या सिनेमाचा आभारी राहीन. या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

आर्या चित्रपटाचे बजेट४ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर ३० कोटींचा व्यवसाय केला. हा तेलुगु चित्रपट अल्लू अर्जुन आणि सुकुमार यांच्या एकत्रित सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. अल्लू व्यतिरिक्त या चित्रपटात अनु मेहता आणि शिवा बालाजी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. 'आर्या' या चित्रपटाचा सीक्वल 'आर्या २' नावाने २००९ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या सीक्वलने चांगली कमाई केली.

वर्कफ्रंटवर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २: द रुल' हा चित्रपट १५ ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांशिवाय सुनील, राव रमेश, अनुसया भारद्वाज आणि जगदीश हे देखील चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. सुकुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. काही काळापूर्वी या चित्रपटातील 'पुष्पा पुष्पा' हे गाणे रिलीज झाले होते, जे प्रेक्षकांना खूप भावले आहे. चित्रपटाचा टीझर, ट्रेलर आणि गाणी रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक 'पुष्पा २: द रुल' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पा