Join us  

"एकाही महिलेने रस्त्यावर येऊन जल्लोष केला नाही.."; RCB ने WPL जिंकल्यावर सिद्धार्थ असं काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 3:36 PM

RCB ने WPL जिंकल्यावर सिद्धार्थ ट्विट करत म्हणाला. त्याने महिला आणि पुरुषांच्या कृतीकडे बोट दाखवत विडंबन केलंय

 काल WPL चा (वूमन्स प्रिमियर लीग) थरारक सामना रंगला. या सामन्यात बंगलोरच्या संघाने बाजी मारली. सर्वच स्तरांकडून RCB संघाचे अभिनंदन होतंय. अशातच बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीत लोकप्रिय झालेला अभिनेता सिद्धार्थने त्याचं स्पष्ट मत व्यक्त केलंय. WPL जिंकल्यावर बंगलोरच्या रस्त्यांवर जल्लोष साजरा करण्यात आला. सिद्धार्थने तोच व्हिडीओ शेअर करत महिलांच्या अनुपस्थितीबद्दल मत व्यक्त केलंय.

सिद्धार्थने व्हिडीओ शेअर करत लिहीलंय की, "महिलांचा संघ एखादी स्पर्धा जिंकला पण एकही महिला हा विजय साजरा करायला रस्त्यावर आली नाही. यातून भारतातील पितृसत्ताक संस्कृती किती पराकोटीची आहे याचा प्रत्यय येतो. हे ट्विट पोस्ट करण्यामागचा हेतू इतकाच की ज्या सहजतेने रात्रीच्या वेळी पुरुष रस्त्यांवर हिंडू शकतात तितकी सुरक्षितता महिलांना वाटत नाही."

सिद्धार्थ पुढे लिहीतो, "माझ्या ट्विटमागचा अर्थ हाच होता की, महिलांचा विजय साजरा करण्यासाठी महिलांनीही पुरुषांसारखं सेलिब्रेशन करायला काहीच हरकत नाही. मी फक्त महिला - पुरुष यांच्या कृतीचं विडंबन केलंय" असं ट्विट सिद्धार्थने लिहीलंय. अशाप्रकारे सिद्धार्थने WPL मध्ये RCB विजयी झाल्यावर खास ट्विट केलंय. दरम्यान काल दिल्ली कॅपिटल्सला ८ विकेट्सने हरवून RCB ने WPL मध्ये विजयाची नोंद केली.