मुंबई : साऊथ सिने इंडस्ट्रीतील अभिनेत्यां इतकीच अभिनेत्रींचीही मोठी लोकप्रियता बघायला मिळते. केवळ साऊथमध्येच नाहीतर देशभरात या अभिनेत्रींनी धमाका करुन आपला एक मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. अनुष्का शेट्टी, काजल अग्रवाल, तमन्ना भाटिया या तर सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्याच्या सिनेमाबाबत तर सर्वांना माहीत आहे. पण त्यांचं शिक्षण किती झालं हे क्वचितच कुणाला माहीत असेल. चला बघुया साऊथच्या काही अभिनेत्रींचं शिक्षण किती झालं आहे.
* अनुष्का शेट्टी
अनुष्काने माऊंट कार्मल कॉलेज, बेंगळुरू येथून कॉम्प्यूटर अॅप्लिकेशनमधून ग्रॅज्यूएशन केलंय. अनुष्काने तिच्या करिअरची सुरूवात 2005 मध्ये ‘सुपर’ या सिनेमापासून केली होती. त्यानंतर तिने ‘डॉन’, ‘किंग’, ‘शौर्यम’, ‘बिल्ला’, ‘अरूंधति’, ‘रगडा’, ‘वेदम’, ‘रूद्रमादेवा’, ‘सिंघम 2’ या सिनेमांमधेय काम केलं. अनुष्का शेट्टीने आतापर्यंत अनेक तेलगु आणि तमिळ सिनेमांमध्ये काम केलं आहे.
* श्रिया सरन
श्रिया सरनने बॉलिवूडच्या ‘मिशन इस्तांबुल’ आणि ‘दृश्यम’ या सिनेमात काम केलंय. तर साऊथच्या ‘संतोषम’, ‘टॅगोर’, ‘शिवाजी द बॉस’, ‘कंदस्वामी’सोबत आणखीही सिनेमात केलंय. श्रियाने दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेज येथून लिटरेचरमधून बीए केलंय.
* काजल अगरवाल
31 वर्षीय काजल अग्रवालने साऊथ सिनेमांमध्ये लोकप्रियता मिळवल्यानंतर बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला होता. तिने ‘स्पेशल 26’ आणि ‘सिंघम’ मध्ये काम केलं. त्याआधी तिने ‘मगधीरा’, ‘थुप्पाकी’ आणि ‘चन्दामामा’ सारख्या गाजलेल्या सिनेमातही काम केलंय. काजलच्या शिक्षणाबाबत सांगायचं तर काजलने मुंबईतील केसी कॉलेजमधून मास मीडियातून ग्रॅज्यूएशन केलंय.
* नयनतारा
अभिनेता-दिग्दर्शक प्रभूदेवा सोबतच्या अफेअरमुळे नयनतारा चांगलीच चर्चेत आली होती. मात्र त्यांच्यात आता वाद झाल्याने ते वेगळे झाले आहेत. 32 वर्षीय नयनतारानेही साऊथच्या अनेक गाजलेल्या सिनेमात काम केलंय. तिच्या शिक्षणाबाबत सांगायचं तर तिने मरथोमा कॉलेज, तिरूवल्ला येथून इंग्लिश लिटरेचरमधून ग्रॅज्यूएट केलं आहे.
* त्रिशा कृष्णन
साऊथमधील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे त्रिशा कॄष्णन. तृषाने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलंय. तिने बॉलिवूडच्या ‘खट्टा मीठा’ या सिनेमातही काम केलं होतं. त्रिशाने चेन्नईच्या एथिराज कॉलेज फॉर वुमन्समधून बीबीए केलंय.