बॉलीवूड सौंदर्यवती आता हॉलीवूडमध्ये नाव गाजवत आहेत. तिकडे प्रियंकाने अमेरिकन टीव्ही इंडस्ट्रीमध्ये चांगलीच धूम केली. नंतर दीपिकानेसुद्धा विन डिजलसोबत चित्रपट मिळवला. मग अशात सोनम कपूर तरी कशी मागे राहणार? जगप्रसिद्ध ब्रिटिश बँड ‘कोल्डप्ले’च्या आगामी अल्बमच्या एका गाण्यात ती झळकणार आहे. ‘अ हेड फुल आॅफ ड्रीम्स’मधील गाण्याची शूटिंग मुंबईत पार पडली. गाण्याच्या व्हिडीओमध्ये सोनम घागरा-चोली, मांग टिका, नोज रिंग अशा देशी लूकमध्ये दिसणार आहे. तिची बहीण रिया कपूरने हा लूक डिझाइन केला आहे. व्हिडीओत सिंगिंग सेन्सेशन बियॉन्सेसुद्धा असणार आहे. सोनम म्हणते, ‘मला कोल्डप्लेची गाणी खूप आवडतात. त्यामुळे अशी संधी मिळाली म्हणून मी खूप खूश आहे.’
सोनमही बनली आता ‘इंटरनॅशनल’
By admin | Updated: January 31, 2016 02:35 IST