Join us

सोनाली कुलकर्णी दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत, लवकरच नवा कोरा कार्यक्रम रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 06:30 IST

या स्पर्धेच्या निमित्ताने सगळ्यांची लाडकी अप्सरा, सोनाली कुलकर्णी परीक्षकांच्या भूमिकेत पाहायला मिळेल. इंद्रपुरीतून उतरलेल्या या अप्सरेसमोर मंचावर या नृत्यांगना आपली नृत्यकला सादर करतील.

मराठमोळी अभिनेत्री आणि रसिकांची लाडकी 'अप्सरा' म्हणजेच सोनाली कुलकर्णी.विविध सिनेमात सोनालीनं भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. पुन्हा एकदा सोनाली छोट्या पडद्यावर एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. एक नवा, कोराकरकरीत आणि अफलातून खजिना घेऊन ती रसिकांच्या भेटीला येणार आहे. येत्या ११ डिसेंबर पासून 'युवा डान्सिंग क्वीन' हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अनेक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि सेलिब्रिटी चेहरे या स्पर्धेतील स्पर्धक म्हणून पाहायला मिळणार आहेत. लोकसंगीत आणि मॉडर्न डान्सफॉर्म अशा दोन्ही प्रकारातील नृत्य स्पर्धक सादर करतील.युवा डान्सिंग क्वीन होण्यासाठीची ही स्पर्धा फारच अटीतटीची होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने सगळ्यांची लाडकी अप्सरा, सोनाली कुलकर्णी  परीक्षकांच्या भूमिकेत पाहायला मिळेल. इंद्रपुरीतून उतरलेल्या या अप्सरेसमोर मंचावर या नृत्यांगना आपली नृत्यकला सादर करतील.

या शिवाय एक उत्तम दिग्दर्शक, अभिनेता असलेला अष्टपैलू कलाकार, अद्वैत दादरकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे आणि आणखी एका परीक्षकाची ओळख अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे . सेलेब्रिटी नर्तिका आणि त्याबरोवर असे मोठे चेहरे , ही मेजवानी प्रेक्षकांसाठी बहारदार ठरणार, हे निश्चित! याशिवाय,  या कार्यक्रमाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा प्रोमो पाहून सगळ्यांची उत्सुकता वाढली आहे.  

टॅग्स :सोनाली कुलकर्णी