महाराष्ट्राची लाडकी आणि आपल्या अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकताच तिचा बर्थ डे जल्लोषात साजरा केला.आपल्या लाडक्या हास्यपरीला म्हणजेच सोनाली कुलकर्णीला तिच्या सहकलाकरांनी एक छानसं सरप्राईझ दिलं, ज्यामुळे सोनालीला खूपच आनंद झाला. शोच्या सेटवर सोनालीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तिच्यासाठी केक मागविण्यात आला होता, स्टेज फुग्यांनी सजवला होता. याविषयी सोनाली सांगते, ‘माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होत हे की, माझा वाढदिवस इतक्या सुंदर प्रकारे माझ्या या सगळ्या मंडळींनी साजरा केला. माझ्या वाढदिवसानिमित्त मला तर सरप्राईझ मिळालेच पण आता प्रेक्षकांनादेखील लवकरच एक सरप्राईझ मिळणार असल्याचे सोनालीने सांगितले आहे.
सोनालीला मिळाले खास ‘बर्थ डे’ गिफ्ट!
By admin | Updated: May 21, 2017 02:55 IST