शॉटगन शत्रुघ्न सिन्हांची मुलगी सोनाक्षीने दबंग चित्रपटातून आपली दखल घ्यायला भाग पाडले होते. त्यानंतर तर चित्रपटाची रांगच लागली. पण त्यातले दबंग २, आर राजकुमार, रावडी राठोड, बुलेट राजा, बॉस असे चित्रपट एकामागोमाग आपटलेच. त्यातल्या त्यात लुटेरा चित्रपटाच्या कामामुळे आणि गाण्यामुळे मात्र सोनाक्षीला हात दिला. अशा फ्लॉप चित्रपटांची अभिनेत्री म्हणून तिची ओळख जास्त बनतेय. आता अर्जुन कपूरबरोबरचा 'तेवर’ चित्रपट तरी तिला यशाचा मार्ग दाखवेल का?
सोनाक्षीला हिटची गरज
By admin | Updated: January 7, 2015 22:32 IST