ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - अभिनेत्री सोहा अली खानला पुन्हा एकदा मुस्लिम धर्माच्या नियमाचं पालन न केल्याबद्दल टीकेला सामेरं जावं लागलं आहे. सोहा अली खानने इन्स्टाग्रामवर आपला पती कुणाल खेमूसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत सोहा अली खान गुलाबी साडीमध्ये दिसत आहे. आता नेमका कोणता कार्यक्रम होता याची माहिती मिळू शकली नाही. मात्र या फोटोवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून ""तुझी लाज वाटते, तू मुस्लिम नाहीस"" अशी टीका केली आहे.
सोहा अली खान गरोदर असून लवकरच त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. यानित्ताने त्यांच्या घरी कार्यक्रम ठेवला असल्याची शक्यता आहे. सोहा अली खानची आई शर्मिला टागोर बंगाली असून यानिमित्ताने घरगुती कार्यक्रमाचं आयोजन केलं असावं. अनेकांनी सोहा अली खानला शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी मात्र टीका केली आहे. या टीकाकारांनी सोहा अली खानला मुस्लिम असूनही साडी नेसल्याबद्दल लक्ष्य केलं आहे तसंच ईदच्या शुभेच्छा न दिल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे.