Join us  

म्हणून राणी मुखर्जी नाही येत सोशल मीडियावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2017 7:40 PM

आजकाल बॉलीवूडमधले सर्वच स्टार सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. पण बॉलीवूडमधील एक स्टार मात्र याला अपवाद आहे. ती स्टार म्हणजे

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 21 -  आजकाल बॉलीवूडमधले सर्वच स्टार सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. ही स्टार मंडळी आपल्या चित्रपटांचे, इव्हेंट्सचे सोशल मीडियावरून  प्रमोशन करत असतात. सोबतच आपल्या पर्सनल लाइफची छायाचित्रेही स्टार्सकडून फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर शेअर केली जात असतात. पण बॉलीवूडमधील एक स्टार मात्र याला अपवाद आहे. ती स्टार म्हणजे बॉलीवुडची राणी  अर्थात राणी मुखर्जी. 
राणी मुखर्जी या क्षेत्रातील अन्य कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर दिसत नाही. आज वाढदिवसाच्या निमित्ताने राणी यशराज फिल्मच्या अधिकृत फेसबूक पेजवर राणी लाइव्ह आली होती. त्यावेळी सोशल मीडियावर नसण्याचे कारण विचारले असता ती म्हणालीमाझ्या नवऱ्याला खाजगी आयुष्य जगणे आवडते. आपले मत, आपल्या जीवनाशी संबंधित असलेल्या गोष्टी चाहत्यांना सांगाव्यात आदिराचे फोटो शेअर करावेत असे मला वाटते, पण मला नवऱ्याच्या आवडीनिवडींचाही विचार करावा लागतो. आपल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर व्हावेत, हे माझ्या नवऱ्याला आवडत नाही. त्यामुळे मी सोशल मीडियापासून दूरच राहते." 
मात्र एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आपण  इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू करण्याच्या विचारात असल्याचे राणीने सांगितले. मर्दानी या यशस्वी चित्रपटानंतर राणीने मुलीच्या जन्मामुळे चित्रपटांमधून ब्रेक घेतला होता. आता ती हिचकी या चित्रपटामधून पुनरागमन करणार आहे.