Join us  

म्हणून आलियाने मि. परफेक्शनिस्टला दिला नकार

By admin | Published: April 08, 2017 5:26 PM

शहंशाह अमिताभ बच्चन आणि मि. परफेक्शनिस्ट आमीर खान हे दोन दिग्गज प्रथमच ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 8 - शहंशाह अमिताभ बच्चन आणि मि. परफेक्शनिस्ट आमीर खान हे दोन दिग्गज प्रथमच ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटासाठी अभिनेत्रीचा शोध सुरु आहे. या चित्रपटासाठी वाणी कपुरने काम करावं अशी निर्माता आदित्य चोप्राची इच्छा होती, मात्र आमिर खानने आलिया भट्टचं नाव सुचवलं होतं. पण आलियाने चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. सुत्रांच्या माहिती प्रमाणे, आमिर खानसोबत काम करण्याची आलियाची फार इच्छा आहे. पण ज्या सिनेमात तिच्या भूमिकेला फार संधी नसेल,त्या सिनेमात आलिया काम करणार नाही, असं तिचं म्हणणं आहे. बद्रीनाथ की दुल्हनियांच्या धमाकेदार यशानंतर आलिया तिच्या प्रत्येक सिनेमातील भूमिकेबाबत चोखंदळ झालीय. तिला कोणत्याही सिनेमात छोटी भूमिका साकारण्याची इच्छा नाहीय. शिवाय आमिर खानच्या सिनेमात अभिनेत्रीला फार संधी नसते.आलियाने सिनेमा करण्यास नकार दिल्यानंतर पुन्हा एकदा आदित्य चोप्रा एका नव्या अभिनेत्रीच्या शोधात आहे. मध्यंतरी या सिनेमासाठी सारा अली खानच्या नावाची चर्चासुद्धा रंगली होती. मात्र यावरुन आदित्य चोप्रा आणि आमिरमध्ये मतभेद निर्माण झाले होते. धूम - ३ नंतर आमिर पुन्हा एकदा दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्यसोबत या चित्रपटात काम करणार आहे. पूर्वीचे केवळ ठग असे नाव बदलून आता ठग्स ऑफ हिंदूस्तान असे ठेवण्यात आले आहे.