Join us

लग्नापर्यंत तरी सिंगलच

By admin | Updated: February 3, 2016 02:27 IST

जोपर्यंत मी लग्न करीत नाही, तोपर्यंत तरी मी सिंगल असून माझ्याबद्दल पसरविल्या जात असलेल्या अफवांचा आणि त्यावर रंगणाऱ्या चर्चांचा खरोखरच मला आता वीट आला आहे,

जोपर्यंत मी लग्न करीत नाही, तोपर्यंत तरी मी सिंगल असून माझ्याबद्दल पसरविल्या जात असलेल्या अफवांचा आणि त्यावर रंगणाऱ्या चर्चांचा खरोखरच मला आता वीट आला आहे, अशा शब्दांत बॉलीवूडची ‘अफगाण जलेबी’ कतरिना कैफ हिने नाराजी व्यक्त केली. अभिनेता रणबीर कपूरसोबतचे तिचे अफेअर आणि ब्रेकअपच्या चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये हॉट विषय असून त्याबाबत विचारले असता, तिने तीव्र नापसंती व्यक्त केली. मुळात हा माझा खासगी विषय असून त्याबद्दल मला विचारू नये, असे तिने ठामपणे सांगितले. ‘माझे कुणासोबत अफेअर आहे आणि कुणासोबत ब्रेकअप झाले या ब्रेकिंग न्यूज पाहण्यापेक्षा मला मी जगातल्या पाच सर्वोत्तम अभिनेत्रींपैंकी एक असल्याची बातमी पाहायला जास्त आवडेल.’