Join us  

गायक दलेर मेहंदीला दोन वर्षाची शिक्षा, मानवी तस्करी भोवली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 2:07 PM

मानवी तस्करीसंदर्बात दलेर मेंहदीवर तब्बल 31 गुन्हे होते. 

नवी दिल्ली - प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांना दोन वर्षा कारावासाची शिक्षा सुनाण्यात आली आहे. 2003मध्ये झालेल्या मानवी तस्करी प्रकरणात आज त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. पंजाब मधील पटियाला कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे. 

2003 मध्ये झालेल्या प्रकरणावर आज पंजाबमधील पटियाल कोर्टात सुनावणी झाली. तब्बल 15 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. बेकायदेशिररित्या लोकांना परदेशात पाठवण्यात आल्याचा दलेर मेंहदीवर आरोप आहे. मानवी तस्करीसंदर्बात दलेर मेंहदीवर तब्बल 31 गुन्हे होते. 

पटियाला कोर्टाच्या निर्णयानंतर पोलिसांनी दलेर मेहंदी यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी तिथे असेल्या लोकांनी गोंधळ घातला पण पोलिसांनी चतुराईने त्याला अटक केली.  दलेर मेहंदी यांच्याविरोधात 2003मध्ये प्रथम अमेरिकामध्ये केस दाखल केली गोती. दलेरने बेकायदेशिररित्या अमेरिकांमध्ये जास्त लोकांना पाठवले आहे. आपल्या म्यूजिक टीमसोबत तो लोकांना पाठव होता असाही त्याच्यावर आरोप आहे.  यासाठी तो त्यांच्याकडून बक्कळ पैसा घेत असे. 

टॅग्स :न्यायालय