Join us  

साधेपणा हीच माझी खरी स्टाइल - सुयश टिळक

By admin | Published: January 08, 2017 2:18 AM

स्टाइल में रहेना का असं म्हटले जाते. मात्र स्टायलिश असण्याची प्रत्येकाची व्याख्या ही वेगवेगळी असते. माझ्यासाठी स्टायलिश असणे,स्टायलिश राहणे म्हणजे तुम्ही तुमची ओरिजिनालिटी

स्टाइल में रहेना का असं म्हटले जाते. मात्र स्टायलिश असण्याची प्रत्येकाची व्याख्या ही वेगवेगळी असते. माझ्यासाठी स्टायलिश असणे,स्टायलिश राहणे म्हणजे तुम्ही तुमची ओरिजिनालिटी टिकवणे.जितके तुम्ही ओरिजिनल असता,जितके ओरिजिनल राहाल तितकेच तुम्ही स्टायलिश दिसता असे मला वाटते.अनेकांचा असा समज आहे की चांगले चांगले कपडे परिधान केल्याने स्टायलिश दिसतो.माझ्या मते मात्र कपडे तुम्ही कोणतेही परिधान करा,ते तुम्हाला योग्यरित्या कॅरी करता आले पाहिजे.मी स्वत: साधे राहणे पसंत करतो.आजच्या तरुणाईच्या भाषेत सांगायचेच झाले तर आय बिलिव्ह इन सिम्पलिसिटी.हीच माझी स्टाइल आहे असे मला वाटते. कारण मला जे आवडते,मला जे भावते आणि त्या क्षणासाठी जे योग्य असते ते मी करतो. माझ्यासाठी तीच माझी खरी स्टाइल आहे.ब-याचदा असे होते की एखादा ट्रेंड किंवा फॅशन फॉलो केली जाते.अशावेळी आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती किंवा आपल्या मित्रांनी काय स्टाइल ठेवली आहे याचा विचार मनात डोकावतो.त्यामुळे स्टायलिश राहण्यासाठी त्यांना कॉपी करण्याचा मोहसुद्धा ब-याचदा आवरत नाही.मात्र त्यांनी जे केले ते आपणही केले पाहिजे असे गरजेचे नसते.स्टायलिश राहण्यासाठी उगाचच आपण काही तरी करतो आहे असे वाटत असेल तर ते मुळीच करु नका. कारण असे करण्याच्या नादात आपणच आपले हसू करुन घेतो. त्यामुळे तुमची स्वत:ची जी स्टाइल आहे तीच चांगल्या पद्धतीने मेंटेन करण्यात खरे शहाणपण आहे. मी तर जी माझी स्टाइल आहे तीच फॉलो करतो,विनाकारण कुणालाही कॉपी करण्याच्या किंवा ट्रेंडच्या फंदात बिल्कुल पडत नाही.स्टायलिश राहण्यासाठी माझा एकच फंडा आहे तो म्हणजे साधे राहण्यावर माझा ठाम विश्वास आहे आणि तीच माझी खरीखुरी स्टाइल आहे.