Join us  

सिद्धार्थ जाधवने ओढला बाप्पाचा रथ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणरायाच्या मिरवणुकीतील व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 1:57 PM

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवही यंदा पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागा झाला. सिद्धार्थने विर्सजन मिरवणुकीत ढोलवादन केलं.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संपूर्ण राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दहा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज भाविक त्याच्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. मुंबईबरोबरच पुण्यात गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीचा उत्साह असतो. पुण्यातील मिरवणुका हा कायमच चर्चेचा विषय असतो. दरवर्षी अनेक मराठमोळे कलाकारही लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. 

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवही यंदा पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागा झाला. सिद्धार्थने विर्सजन मिरवणुकीत ढोलवादन केलं. पुण्यातील पाच मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत सिद्धार्थ जाधव आणि अभिनेता सौरभ गोखले सहभागी झाले होते. आकर्षक रथातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मिरवणूक काढण्यात आली होती. सिद्धार्थ जाधव आणि सौरभ गोखलेने बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणरायाचा रथ ओढला. 

सिद्धार्थ जाधव आणि सौरभ गोखले यांच्याबरोबर अनेक मराठी कलाकार बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. सिद्धार्थ आणि सौरभबरोबर तेजस्विनी पंडीत, अनुजा साठेदेखील पुण्यातील बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. 

टॅग्स :सिद्धार्थ जाधवसेलिब्रिटीसेलिब्रिटी गणेश