Join us  

"सिनेमातील बिकिनी सीन्समुळे मला ट्रोल केलं आणि...", ट्रोलिंगवर श्रुती मराठे पहिल्यांदाच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 8:55 AM

श्रुतीला तिच्या बिकिनी सीन्समुळे ट्रोल करण्यात आलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रुतीने याचा खुलासा केला आहे.

श्रुती मराठे ही मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'राधा ही बावरी' मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेल्या श्रुतीने अनेक सिनेमांतही काम केलं आहे. अभिनयाच्या जोरावर मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलेल्या श्रुतीने साऊथ इंडस्ट्रीमध्येही अभिनयाची छाप सोडली. श्रुतीने मराठीबरोबरच अनेक दाक्षिणात्य सिनेमांतही काम केलं आहे. दाक्षिणात्य सिनेमात श्रुतीने बिकिनी सीन्स दिले होते. त्यामुळे तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. 

'राधा ही बावरी' मालिका हिट झाल्यानंतर श्रुतीला तिच्या बिकिनी सीन्समुळे ट्रोल करण्यात आलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रुतीने याचा खुलासा केला आहे. "मला अजुनही आठवतंय की २०१२ साली माझी राधा ही बावरी मालिका आली होती. त्याआधी मी काही तमिळ सिनेमांत काम केलं होतं. त्यातील एक चित्रपट प्रचंड गाजला होता कारण, मी त्यात बिकिनी घातली होती. आता साऊथ इंटस्ट्री आणि आपल्यातील अंतर हे कमी झालेलं आहे. साऊथचे सिनेमे आता हिंदीच भाषांतरित केले जातात. ओटीटीवर अनेक सिनेमे उपलब्ध आहेत. थिएटरमध्ये तुम्ही सिनेमे बघायला गेलात तर सब टायटल्स असतात. पण १०-१५ वर्षांपूर्वी असं नव्हतं," असं 'आरपार' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत श्रुती म्हणाली. 

पुढे ती म्हणाली, "तेव्हा मी नवीन होते. कोणत्या गोष्टी करायच्या किंवा काय पद्धतीने त्या केल्या जातात, शूट कशा केल्या जात्यात याचं भान नव्हतं. पण, आजही मी बिकिनीचा सीन का केला असं मला वाटत नाही. पण, मला अजुनही आठवतंय की तो चित्रपट २०१० साली प्रदर्शित झालेला. तेव्हा लोकांन मी बिकिनी घातलीये किंवा तमिळमध्ये काम केलंय हे माहीत नव्हतं. २०१२मध्ये जेव्हा राधा ही बावरी मालिका गाजली आणि लोकांनी श्रुती मराठे कोण? हे गुगल केलं. तेव्हा माझा पहिला फोटो बिकिनीचा यायला लागला. तेव्हा मला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. राधा ही ब्रावरी वगैरे असं लोक म्हणायचे." 

श्रुतीने 'तप्तपदी', 'शुभ लग्न सावधान', 'सरसेनापती हंबीरराव', 'सनई चौघडे', 'धर्मवीर', 'मुंबई-पुणे-मुंबई २' अशा अनेक मराठी सिनेमांत काम केलं आहे. मराठीबरोबर अनेक साऊथ चित्रपटांतही ती झळकली. 'गुरू शिश्यन' या तमिळ सिनेमात तिने बिकिनी सीन्स दिले होते. अभिनयाबरोबर श्रुती उत्तम डान्सही करते. श्रुतीने नुकतंच निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. 

टॅग्स :श्रुती मराठेमराठी अभिनेतासेलिब्रिटी