Join us

श्रुती आणि सुबोधची जोडी पुन्हा झळकणार

By admin | Updated: March 6, 2017 03:11 IST

श्रुती मराठे आणि सुबोध भावे या दोघांनी ‘बंध नायलॉन’चे या चित्रपटात काम केले होते

श्रुती मराठे आणि सुबोध भावे या दोघांनी ‘बंध नायलॉन’चे या चित्रपटात काम केले होते. या दोघांची या चित्रपटातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती आणि आता ते दोघे पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. श्रुतीनेच ही बातमी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवरून तिच्या फॅन्सना दिली आहे. तिने तिचा आणि सुबोधचा एक छानसा फोटो पोस्ट करून त्याला कॅप्शन दिले आहे. तिने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, माझा नवीन चित्रपट, नवीन दिवस पण जुना मित्र. या कॅप्शनवरून ते दोघे चित्रपटात एकत्र काम करत असल्याचे तिने सांगितले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या दुबई येथे सुरू असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या आधीचा एक व्हिडिओदेखील श्रुतीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तिची हेअर ड्रेसर तिचे केस सेट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावरून या चित्रपटातील श्रुतीचा लूकदेखील वेगळा असणार असल्याची चर्चा आहे. श्रुती सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत तिच्या फॅन्सना तिच्या या नवीन चित्रपटाबाबत माहिती देत आहे. यातूनच ती या चित्रपटाबाबत खूप उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.