Join us  

धक्कादायक! जॅकलीन फर्नांडिसच्या इमारतीला भीषण आग, आलिशान घराचं नुकसान?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 8:44 AM

जॅकलीनने वर्षभरापुर्वीच या इमारतीत आलिशान घर खरेदी केलं होतं. या घराचं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही चर्चेतील अभिनेत्री. जॅकलीनबाबत एक महत्वाची माहिती समोर येतेय.  जॅकलीन राहत असलेल्या इमारतीला आग लागल्याची बातमी समोर आली आहे. इमारतीला लागलेल्या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांना धक्का बसलाय. या इमारतीच्या १५व्या मजल्यावर जॅकलिन फर्नांडिसचे 5 BHK घर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जॅकलीन फर्नांडिसच्या इमारतीमधील 13, 14 व्या मजल्यावर आग लागली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आगीची तीव्रता प्रचंड असून ती वेगाने वाढत आहे. आगीमुळे परिसरात धूरही निर्माण झालाय. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्री अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

ही दुर्घटना घडत असताना जॅकलीन फर्नांडिस तिच्या घरी उपस्थित होती का? असा प्रश्न चाहत्यांना पडला असून चाहतेही अभिनेत्रीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. रिपोर्टनुसार जॅकलीन घरी नव्हती. परंतु तिच्या आलिशान घराचं नुकसान झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत  आहे. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलेले नाही.

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसआग