Join us  

"प्लास्टिक लावायची काय गरज होती?", हटके ड्रेसमुळे ट्रोल झाली शिल्पा शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 4:21 PM

अनेकदा शिल्पा शेट्टीच्या हटके फॅशनची चर्चा होताना दिसते. सध्या शिल्पाचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून ९०चं दशक गाजवणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी.  अभिनयाबरोबरच शिल्पा तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. शिल्पा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते. सुडौल शरीरयष्टी असणारी शिल्पा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते. अनेकदा तिच्या हटके फॅशनची चर्चा होताना दिसते. सध्या शिल्पाचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

 शिल्पाने नुकतीच एका इव्हेंटला हजेरी लावली होती. यासाठी तिने खास काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करत फॅशन केली होती. या काळ्या रंगाच्या ड्रेसबरोबर तिने कमरेला प्लास्टिकसारखं काहीतरी लावल्याचं दिसत होती. पण हा हटके आऊटफिट परिधान करत स्टाइल करण्याच्या नादात शिल्पा ट्रोल झाली आहे. शिल्पाचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरलेला नाही. या लूकसाठी आणि आऊटफिटसाठी नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

इव्हेंटदरम्यान शिल्पाने पापाराझींना फोटोसाठी पोझही दिल्या. या इव्हेंटमधील शिल्पाचा व्हिडिओ विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. "सगळे उर्फीला फॉलो करत आहेत", "ते प्लास्टिक ऑक्सिजन मास्कसारखं वाटत आहे", "ड्रेस डिजायनर -राज कुंद्रा", "प्लास्टिक लावायची काय गरज होती?" अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :शिल्पा शेट्टीसेलिब्रिटी