Join us  

Shehnaaz Gill : लोकमत डिजिटल पर्सनॅलिटी ऑफ द इयरची मानकरी ठरली शहनाज गिल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 8:07 PM

Shehnaaz Gill: शहनाज गिल अनेक वर्षांपासून पंजाबी इंडस्ट्रीत कार्यरत आहे. पण तिला खरी ओळख बिग बॉस १३ मधून मिळाली ज्यामध्ये ती एक स्पर्धक म्हणून सहभाही झाली होती.

लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड २०२३ (Lokmat Digital Creator Awards 2023) सोहळ्याला मोठ्या दिमाखात नुकतीच सुरुवात झाली आहे. या पुरस्कार सोहळ्यात डिजिटल माध्यमात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात लोकमत डिजिटल पर्सनॅलिटी ऑफ द इयरची मानकरी पंजाबची कतरिना म्हणजेच शहनाज गिल (Shehnaaz Gill) ठरली आहे. तिला  शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. 

शहनाज गिलने पंजाबी गाणं गाऊन या सोहळ्याला चारचाँद लावले आहेत. मला हा पुरस्कार दिला त्यासाठी लोकमतची मी आभारी आहे. तसेच माझ्या चाहत्यांची मी खूप आभारी आहे. माझे श्वास चालू आहेत, तोपर्यंत मी प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहेन, असे शहनाज यावेळी म्हणाली.

शहनाज गिल अनेक वर्षांपासून पंजाबी इंडस्ट्रीत कार्यरत आहे. पण तिला खरी ओळख बिग बॉस १३ मधून मिळाली ज्यामध्ये ती एक स्पर्धक म्हणून सहभाही झाली होती. या शोमधून तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. तिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले, परंतु तिची लोकप्रियता एखाद्या मोठ्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. ती सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या 'तौडा कुत्ता टॉमी, सादा कुत्ता कुत्ता' या गाण्याला सोशल मीडियावर खूप पसंती मिळाली होती. नेटिझन्स तिच्या सोशल मीडिया पोस्ट्सवर प्रेम करतात. इंस्टाग्रामवर तिचे १४ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.

शहनाज गिल हिने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्वतःमध्ये खूप बदल केला. ती दिवसेंदिवस ग्लॅमरस होत चालली आहे. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते. आता लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, तेही सलमान खानच्या चित्रपटातून. ती 'कभी ईद कभी दिवाळी'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आयुष शर्मा, पूजा हेगडे पाहायला मिळणार आहेत.

टॅग्स :शेहनाझ गिललोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड्स 2023आदित्य ठाकरेऋषी दर्डाआदित्य ठाकरे