Join us

शत्रुघ्न-अमिताभचा पुन्हा ‘दोस्ताना’

By admin | Updated: January 19, 2015 22:32 IST

१८ जानेवारीला शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलाचा कुशचा लग्नसोहळा मुंबईत पार पडला.

१८ जानेवारीला शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलाचा कुशचा लग्नसोहळा मुंबईत पार पडला. या लग्नसोहळ्याला अमिताभ आणि जया बच्चन यांनी उपस्थिती लावली व संपूर्ण बॉलीवूड जगतात कुजबुज सुरू झाली. १९७० च्या काळात मोठा पडदा गाजविणारी शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ बच्चन यांच्यात कुरबुर सुरू होती. आता इतक्या वर्षांनी त्यांच्यातील हा दुरावा मिटला असल्याचे अमिताभ-जयाच्या उपस्थितीने दिसते.