Join us  

शशांकलाही EV चं वेड! नवीन कारचे फोटो शेअर करत म्हणाला, 'गेल्या 14 वर्षात माझ्या...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 1:20 PM

शशांकने नव्या गाडीचे फोटो शेअर करत छान कॅप्शनही दिलं आहे.

मराठी अभिनेताशशांक केतकर (Shashank Ketkar) सध्या 'मुरांबा' मालिकेमुळे चर्चेत आहे. मालिकेतील रमा-अक्षयची जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. तसंच मालिकेत ट्वीस्टही आला असल्याने बघायला मजा येत आहे. शशांकचं प्रोफेशन आयुष्य उत्तम सुरु असतानाच त्याने आता चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. या नवीन वर्षात शशांकने नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. तेही पेट्रोल कार नव्हते तर शशांक इलेक्ट्रिक व्हेहिकल(EV) च्या प्रेमात आहे. त्याने टाटा नेक्सॉन ही ईव्ही कार घेतली आहे. शशांकने नव्या गाडीचे फोटो शेअर करत छान कॅप्शनही दिलं आहे.

शशांक केतकर नेहमीच पर्यावरणासंबंधी जागरुक असतो. अनेकदा तो सोशल मीडियावर व्यक्तही होत असतो. तसंच आजूबाजूला दिसणाऱ्या घडामोडींवर तो भाष्य करत असतो. पर्यावरणाचा विचार करत शशांकने EV कार खरेदी करत समाजाप्रती आपलं कर्तव्य पार पाडलं आहे.

 त्याने कॅप्शन देत लिहिले,'नवीन technology नी मला कायमच भुरळ घातली आहे. Electric vehicle असा काही प्रकार असतो हे ज्या वयापासून मला कळू लागलं आहे तेव्हा पासून, आपण एकदा एक EV घ्यायची हे स्वप्नं होतं. मागच्या १४ वर्षात माझ्या ३ गाड्या झाल्या. पहिली मारुती सुझुकी एर्टिगा, दुसरी सेल्टोस, आणि आात टाटा नेक्झॉन. मागच्या वर्षी जेव्हा ओला इलेक्ट्रिक  घेतली, तेव्हाच ठरवलं होतं की योग्य वेळं आली की petrol car वरून मी EV car वर सुद्धा shift होईन! आणि वर्षभरातच EV car दारात आली देखील.'

शशांकच्या या पोस्टवर सगळेच त्याला शुभेच्छा देत आहेत. तो मालिका असो किंवा सिनेमा सगळ्याच ठिकाणी उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. त्याची 'होणार सून मी या घरची' ही मालिका अजूनही प्रेक्षक आवडीने पाहतात. शशांक आगामी काही मराठी  आणि हिंदी सिनेमांमध्येही दिसणार आहे. शिवाय दो हंसल मेहतांच्या 'स्कॅम 2' सीरिजमध्येही दिसला. त्याच्या अभिनयाचं सगळ्यांनीच कौतुक केलं. 

 

टॅग्स :शशांक केतकरमराठी अभिनेताइलेक्ट्रिक कार / स्कूटर