Join us  

Shamshera Teaser: अंगावर काटा आणणारा ‘शमशेरा’चा Dangerous टीझर, पाहून येईल ‘KGF’ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 12:48 PM

Shamshera Teaser: सांसों में तूफानों का डेरा... निगाहें जैसे चील का पहरा... कोई रोक ना पाएगा इसे.. जब उठे ये बनके सवेरा...

Shamshera Teaser: रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) बहुप्रतिक्षीत ‘शमशेरा’ (Shamshera ) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. अलीकडे या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आणि आता या चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर पाहून अंगावर शहारा येईल.

रणबीर कपूर, वाणी कपूर (Vani Kapoor) व संजय दत्तच्या (Sanjay Dutt)  ‘शमशेरा’ची चाहते दीर्घकाळापासून प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटातील रणबीरचा लुक पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. आता ‘शमशेरा’चा टीझर पाहून चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 

‘शमशेरा’चा टीझर अंगावर काटा आणतो. संजय दत्तच्या एन्ट्रीने टीझरची सुरूवात होते. त्याचा लुक थक्क करतो. गरिब लोकांवर अन्याय, अत्याचार करताना तो दिसतो. यानंतर घोड्यावर बसलेल्या रणबीरची एन्ट्री होते. त्याचा इंटेन्स लुक पाहून धक्का बसतो. सांसों में तूफानों का डेरा... निगाहें जैसे चील का पहरा... कोई रोक ना पाएगा इसे.. जब उठे ये बनके सवेरा... हा रणबीर कपूरच्या आवाजातील डायलॉग मनाला भावतो. हा टीझर पाहिल्यावर एका चित्रपटाची हटकून आठवण येते. ती म्हणजे, केजीएफची. 

‘शमशेरा’ हा सिनेमा हिंदीशिवाय तामिळ आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. यशराज बॅनरचा हा सिनेमा करण मल्होत्रा यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची कथा 1800 च्या उत्तरार्धातील आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटाची कथा एका कुळाच्या त्यांच्या हक्कांसाठी आणि ब्रिटिशांपासून स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लढ्याभोवती फिरते.  रणबीर कपूर या चित्रपटात डबलरोलमध्ये दिसणार आहे. त्याच्या एका व्यक्तिरेखेचं नाव शमशेरा आहे तर दुसºया व्यक्तिरेखेचं नाव बल्ली आहे.  150 कोटी रूपये खर्चून हा सिनेमा बनला आहे. येत्या 22 जुलैला हा सिनेमा रिलीज होतोय. त्याआधी येत्या 24 जूनला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :रणबीर कपूरसंजय दत्तवाणी कपूरबॉलिवूड