Join us
Daily Top 2Weekly Top 5

निगेटीव्ह कमेंट्सवर भडकली शमिता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 02:40 IST

शिल्पा शेट्टीची लहान बहीण शमिता शेट्टी सध्या जाम भडकलेली आहे.

मुंबई- शिल्पा शेट्टीची लहान बहीण शमिता शेट्टी सध्या जाम भडकलेली आहे. याला कारण म्हणजे, सोशल मीडियावरचे निगेटीव्ह कमेंट्स. अलीकडेच शमिताने फादर्सच्या निमित्ताने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यात शमिता बहीण शिल्पा शेट्टीसोबत वडिलांच्या प्रतिमेवर फुल अर्पण करताना दिसली होती. या व्हिडिओच्या पोस्टमध्ये शमिताने ‘मिस यू डॅड’ असे लिहिले होते. पण शमिताने हा व्हिडिओ पोस्ट केला आणि लगेच ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. शमिता आणि शिल्पा दोघीही हसून हसून पित्याच्या प्रतीमेला पुष्पांजली वाहत आहेत, हे पाहून काही लोकांनी शिल्पा व शमिता दोघींनाही धारेवर धरले. पण लोकांच्या या नकारात्मक प्रतिक्रिया शमिताला चांगल्याच खटकल्या. इतक्या की, ती रागाने लालबुंद झाली आणि तिने ट्रोलर्सला खरमरीत उत्तर दिले. ‘खरे ती मी कायम नकारात्मक प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करते. पण तुम्ही नकारात्मक प्रतिक्रियांसाठी चुकीचा दिवस निवडला. जी मुलगी आपल्या पित्याची पूजा करते, तिच्याबद्दल तुम्ही हीन प्रतिक्रिया दिल्यात. मला अशा प्रतिक्रिया देणाऱ्यांना स्वत:चे फॉलोअर्स म्हणतांना लाज वाटतेय. कृपया मला त्वरित अनफॉलो करा. कारण मला निगेटीव्ह लोक अजिबात आवडत नाही.’ असे तिने नेटिझन्सना सुनावले.