Join us

शाहरूखचा थ्रीडी प्रिंट पुतळा

By admin | Updated: January 19, 2015 10:01 IST

शाहरूख आणि गौरी खानच्या रेड चिलीज व्हीएफएक्स कंपनीने नुकताच शाहरूखचा थ्रीडी प्रिंट पुतळा त्याच्या खास पोझमध्ये बनवला आहे

शाहरूख आणि गौरी खानच्या रेड चिलीज व्हीएफएक्स कंपनीने नुकताच शाहरूखचा थ्रीडी प्रिंट पुतळा त्याच्या खास पोझमध्ये बनवला आहे. थ्रीडी प्रिंट तंत्रज्ञान वापरून बनवलेल्या जगातल्या या पहिल्या पुतळ्यासाठी बाहू पसरून थांबण्याची शाहरूखची जगप्रसिद्ध स्टाइल वापरण्यात आली आहे. तंत्रज्ञान किती पुढे गेले आहे, हे पाहून मी भारावून गेलो आहे. असे तंत्रज्ञान वापरून माझा पुतळा बनवला जाणे ही थरारक गोष्ट असल्याचे शाहरूख सांगतो.