Join us  

बापलेकीची कमाल जोडी! शाहरुख-सुहाना पहिल्यांदाच एकत्र, हे ठरलं खास कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 10:12 AM

शाहरुख खान - सुहाना खान या बापलेकीला पहिल्यांदाच एकत्र पाहून चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलंय

शाहरुख खान हा बॉलिवूडचा बादशाह. शाहरुखने अभिनयाच्या माध्यमातून जगभरात नाव कमावलंय. शाहरुखची पुढची पिढी म्हणजेच त्याची मुलं सुहाना आणि आर्यन सुद्धा आता मनोरंजन विश्वात सक्रीय होत आहेत. सुहानाने काही महिन्यांपुर्वी रिलीज झालेल्या The Archies या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं. आता शाहरुख - सुहाना ही बापलेकीची जोडी पहिल्यांदाच ऑनस्क्रीन एकत्र आलीय. 

शाहरुखचा लेक आर्यन खान त्याचा कपड्यांचा ब्रँड 'डायवोल्क्स'साठी दिग्दर्शक झालाय. यानिमित्तान त्याचे वडिल शाहरुख आणि बहीण सुहाना एकत्र आले आहेत. नवीन जाहिरातीमध्ये शाहरुख त्याची मुलगी सुहानासोबत दिसलाय. शाहरुख - सुहानाला पहिल्यांदाच ऑनस्क्रीन एकत्र पाहून चाहत्यांना खुप आनंद झालेला दिसला. आर्यनच्या कपड्यांच्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी शाहरुख - सुहाना या बापलेकीची कमाल ऑनस्क्रीन केमिस्ट्री दिसली.

शाहरुख खानने काल महिला दिनानिमित्त या जाहिरातीचा टीझर लॉंच केला. शाहरुखचा दिलखेचक परफॉर्मन्स आणि त्यात सुहानाची ग्लॅमरस एन्ट्री अशा अनेक गोष्टींमुळे ही जाहिरात चांगलीच लोकप्रिय झाली.  सुहाना आणि शाहरुख खानला पहिल्यांदा  एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केला. आर्यनचा 'डायवोल्क्स' हा क्लोथिंग ब्रँड चांगलाच लोकप्रिय असून १७  मार्चला हा ब्रँड रिलॉंच होतोय.

टॅग्स :शाहरुख खानसुहाना खानआर्यन खान