Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मी सिगरेटच्या धुरात वेढला गेलोय', शाहरुखचा खुलासा; चाहते काळजीने म्हणाले, 'जगात प्रेम...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 10:58 IST

शाहरुखला स्मोकिंगचं व्यसन आहे हे त्याने अनेकदा मान्य केलंय.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan)  'पठाण' (Pathaan) नंतर आता आगामी 'जवान' (Jawan) सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याने काल पुन्हा ASKsrk मधून ट्वीटरवर चाहत्यांशी संवाद साधला. या माध्यमातून शाहरुख त्याच्या चाहत्याच्या प्रश्नांवर भन्नाट उत्तरं देतो. दरम्यान शाहरुखला स्मोकिंगचं व्यसन आहे हे त्याने अनेकदा मान्य केलंय. यावरुनच चाहत्याने विचारलेल्या प्रश्वावर शाहरुखने मोठा खुलासा केलाय.

सोमवारी ASKsrk सेशनमध्ये शाहरुखला चाहत्याने विचारलं, 'तू स्मोकिंग सोडलंस का?' 

यावर शाहरुख म्हणाला,'हो मी तेव्हा खोटं बोललो. मी सिगरेट स्टिकच्या धुरात वेढला गेलोय.'

अभिनेत्याच्या या उत्तराने चाहत्यांना भावूक केलंय. 'कधीच काही होणार नाही...एसआरके तू कायम राहा जगात प्रेमाची गरज आहे आणि तूच अपार प्रेम पसरवत आहेस.'

2011 च्या एका मुलाखतीत शाहरुखने त्याच्या सिगरेट ओढण्याच्या सवयीवर खुलासा केला होता. तो म्हणाला होता,'मला झोप येत नाही. मी जवळपास १०० सिगरेट ओढतो. या सगळ्यात मी जेवायचंही विसरतो.  इतकंच नाही मी पाणी पण पीत नाही. एकूण ३० कप ब्लॅक कॉफी पितो आणि माझे सिक्स पॅक्स अॅब्सही आहेत. त्यामुळे जितकं मी स्वत:ची काळजी घेत नाही तितकी आपोआपच काळजी घेतली जाते.'

शाहरुख खानच्या 'पठाण'ने बॉक्सऑफिसवर तुफान यश मिळवलं. चार वर्षांनी शाहरुखने धमाकेदार कमबॅक केलं. आता त्याचे सिनेमे बॅक टू बॅक येणार आहेत. आता त्याचा 'जवान' सिनेमा चर्चेत आहे.यातील त्याचा लुकही समोर आला आहे. ७ सप्टेंबर रोजी सिनेमात प्रदर्शित होणार आहे. चाहते याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

टॅग्स :शाहरुख खानधूम्रपानबॉलिवूड