Join us

शाहरूख खान करणार मराठी चित्रपटाची निर्मिती

By admin | Updated: January 31, 2017 18:26 IST

'सैराट'च्या यशानंतर बॉलिवूडलाही मराठी इंडस्ट्रीचं 'याड लागलंय' असंच म्हणाव लागेल.शाहरूख करणार मराठी चित्रपटाची निर्मिती.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 31 - सुपरहीट मराठी चित्रपट 'सैराट'च्या यशानंतर बॉलिवूडलाही मराठी इंडस्ट्रीचं 'याड लागलंय' असंच म्हणाव लागेल.  काही दिवसांपूर्वी जॉन अब्राहमने मराठी सिनेमाची निर्मिती करण्याची इच्छा व्यक्त केली होती तर प्रियंका चोप्राच्या होम प्रोडक्शनची निर्मिती असलेला व्हेंटिलेटर सिनेमा प्रेक्षकांना चांगलाच आवडला. 

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखलाही मराठी चित्रपट इंडस्ट्रीची भुरळ पडल्याचं दिसतंय. लवकरच मराठी सिनेमाची निर्मिती करणार असल्याची घोषणा शाहरूखने केली आहे.  एका वर्षापासून माझी टीम मराठी चित्रपटाच्या कथेवर काम करत आहे असं एका मुलाखतीत त्याने सांगितलं. 
 
''सैराटची निर्मिती माझ्या काही मित्रांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच ते मला सैराटच्या बिझनेसबद्दल सांगत होते. मी अजून सैराट व्यवस्थित बघितला नाही, पण जेवढा बघितला त्यात मला सिनेमातील डायलॉग फार आवडले. मराठी सिनेमाच्या कथा हिंदी सिनेमांपेक्षा चांगल्या आणि मनोरंजक असतात.  म्हणूनच आता मी माझं होम प्रोडक्शन रेड चिलीजच्या अंतर्गत मराठी सिनेमाची निर्मिती करण्यास सज्ज आहे, माझ्या टीमला मी त्यासाठी कामालाही लावलं आहे'' , असं शाहरूख म्हणाला.