Join us  

शहनाज गिल या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात, म्हणाली - 'ती ज्या प्रकारे...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 7:29 PM

Shehnaaz Gill : मागच्या आठवड्यात रिलीज झालेल्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकलेली शहनाज गिल कायम विविध कारणांमुळे चर्चेत राहिली आहे.

बिग बॉस १३ (Bigg Boss 13) फेम शहनाज गिल (Shehnaaz Gill) गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून शहनाजने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सातत्याने ती चर्चेत येत आहे. नुकतेच शहनाजने एका मुलाखतीत तिला मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) आवडत असून तिच्यासारखे सिनेमात काम करायचे असल्याचे सांगितले होते.

मागच्या आठवड्यात रिलीज झालेल्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकलेली शहनाज गिल कायम विविध कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. वर्तमानातील सलमान खानच्या मर्जीतील अभिनेत्री असं शहनाजला म्हटलं जातं. 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटानंतर कशा प्रकारच्या फिल्म्स करायच्या आहेत असं विचारल्यावर शहनाजने राधिका आपटेसारखे चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली. 

शहनाज म्हणाली की, प्रेक्षक जोडले जातील अशा चित्रपटांमध्ये मला काम करायचं आहे. मला विविध प्रकारची कॅरेक्टर्स साकारायची आहेत. राधिका आपटे ज्या प्रकारचे चित्रपट करते तसे करायला मला आवडतील. असे चित्रपट आणि कॅरेक्टर्स आव्हानात्मक असतील आणि माझ्यातील कलाकारातील प्रतिभेला वाव देणारी ठरतील असंही शहनाज म्हणाली.किसी का भाई किसी की जान चित्रपटात सलमान, शहनाज व्यतिरिक्त पूजा हेगडे, दग्गुबती व्यंकटेश, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, पलक तिवारी आणि जस्सी गिल यांच्यासह अनेक प्रसिद्ध स्टार्स आहेत.

टॅग्स :शेहनाझ गिलसलमान खानराधिका आपटे