Join us

शाहिद कपूर दिसणार नव्या लूकमध्ये

By admin | Updated: December 23, 2015 20:08 IST

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आता एका वेगऴ्या लूकमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. अभिनेता शाहिद कपूरचा आगामी रंगून हा चित्रपट येत असून यामध्ये तो एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि. २३ - बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आता एका वेगऴ्या लूकमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. अभिनेता शाहिद कपूरचा आगामी 'रंगून' हा चित्रपट येत असून यामध्ये तो एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 
'रंगून' हा चित्रपट दुस-या महायुद्धातील लव्ह स्टोरीवर आधारित असून या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज करणार आहे. या चित्रपटांमध्ये अभिनेता शाहिद कपूर याच्यासह अभिनेता सैफ अली खान आणि कंगना राणावत दिसणार आहेत. तसेच, मुंबई, अरुणाचल प्रदेश आणि अमेरिकेत या चित्रपटाचे शूटींग करण्यात येणार आहे.