शा हिद कपूरच्या हैदर या चित्रपटाची रिलीजची वेळ जवळ येत चालली आहे तोच चित्रपटातील शाहिदचा डान्सही लोकांना आकर्षित करीत आहे. शाहिद एक चांगला डान्सर असून विविध प्रकारचे डान्स करण्यात तो तरबेज आहे. आता त्याला भरतनाटय़म शिकण्याची इच्छा आहे. भरतनाटय़मचे आकर्षण असण्याचे कारण म्हणजे, शाहिदच्या आई नीलिमा अजीम एक उत्कृष्ट भरतनाटय़म नृत्यांगणा आहेत. याबाबत तो सांगतो की, ‘मला संधी मिळाली तर भरतनाटय़म करायला नक्कीच आवडेल.’