शाहिद कपूर आणि आलिया भट्ट सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘शानदार’मुळे चर्चेत आहेत. त्यांचा हा चित्रपट २२ आॅक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून ‘नजदिकीयाँ’ हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दोघांमध्ये उत्कृष्ट केमिस्ट्री पाहावयास मिळणार आहे. शाहीद-आलिया रोमान्स करताना दिसतील. या गाण्याचे विशेष म्हणजे ते ब्लॅक अॅण्ड व्हाइट विंटेज थीमवर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याला निखिल पॉल जॉर्ज आणि नीती मोहन यांनी गायले आहे. याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. अमित त्रिवेदी हे संगीत दिग्दर्शक आहेत.
शाहिद-आलियाची ‘नजदिकीयाँ’ हिट
By admin | Updated: October 1, 2015 02:07 IST