Join us  

'डंकी'नंतर 'धूम ४'मध्ये दिसणार शाहरूख? समोर आली किंग खानच्या आगामी सिनेमाची मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 4:55 PM

Shah Rukh Khan : यावर्षी शाहरुख खान 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या तीन बॅक टू बॅक हिट चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर आघाडीवर आहे. नुकताच त्याचा 'डंकी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

यावर्षी शाहरुख खान (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan), 'जवान' (Jawan) आणि 'डंकी' (Dunki) या तीन बॅक टू बॅक हिट चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर आघाडीवर आहे. नुकताच त्याचा 'डंकी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. शाहरुखच्या पुढच्या चित्रपटाबद्दल अफवा पसरत होत्या की यशराज फिल्म्सच्या सर्वात प्रसिद्ध फ्रँचायझींपैकी एक असलेल्या 'धूम ४' (Dhoom 4) मध्ये बॉलिवूडचा बादशाह दिसणार आहे. या अफवा निराधार असल्याचा दावा आता केला जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'धूम' फ्रँचायझीचे निर्माते चित्रपटाच्या चौथ्या भागावर काम करत आहेत. चित्रपटातील कलाकार अद्याप ठरलेले नाहीत. 'धूम ४'मध्ये शाहरुख खानच्या अभिनयाचे वृत्त निराधार आहे. अद्याप काहीही लॉक केलेले नाही. सध्या या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र चित्रपटातील कलाकारांची निवड अद्याप झालेली नाही. याआधी अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, शाहरुख आणि राम चरण 'धूम ४' मध्ये दिसणार आहेत.

'धूम'मध्ये होते हे कलाकार

२००४ मध्ये रिलीज झालेल्या 'धूम' द्वारे, संजय गढवी आणि यशराज फिल्म्सने बॉलिवूडला एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट दिला, जो तेव्हापासून अॅक्शनसाठी बेंचमार्क बनला आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, उदय चोप्रा, ईशा देओल आणि रिमी सेन यांच्या भूमिका आहेत. धूम हा व्यावसायिक यशस्वी ठरला आणि २००४ चा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला.

'धूम' सीक्वल

कथेबद्दल सांगायचे तर, चित्रपटाची कथा एका मोटार सायकलवरील दरोडेखोरांच्या टोळीभोवती फिरते जी मुंबईत दरोडे घालतात. एक पोलीस अधिकारी आणि मोटारसायकल विक्रेता त्यांना थांबवतात. चित्रपटाचे सिक्वेल 'धूम २' (नोव्हेंबर २००६) आणि 'धूम ३' (डिसेंबर २०१३) रिलीज झाले. 'धूम २' च्या कलाकारांमध्ये हृतिक रोशन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, बिपाशा बसू आणि उदय चोप्रा यांचा समावेश होता. 'धूम ३' मध्ये आमिर खान, अभिषेक बच्चन, कतरिना कैफ, उदय चोप्रा आणि जॅकी श्रॉफ सारखे कलाकार होते.

टॅग्स :शाहरुख खानडंकी' चित्रपटजवान चित्रपटपठाण सिनेमा