Join us

जेव्हा शाहरुख खानसाठी दिग्दर्शक बनला आमिर खान, दिल्लीत केलं सिनेमाचे शूटिंग

By गीतांजली | Updated: November 9, 2020 13:16 IST

दुबईला रवाना होण्यापूर्वीच शाहरुखने शूटिंग पूर्ण केले आहे.

अभिनेता आमिर खानच्या 'लालसिंग चड्ढा' सिनेमात शाहरुखने कॅमिओ करणार असल्याची माहिती समोर आली आहे. शाहरुख खानच्या या भूमिकेसाठी आमिर खान दिग्दर्शक झाला. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, दुबईला रवाना होण्यापूर्वीच शाहरुखने 'लालसिंग चड्ढा' सिनेमातील कॅमिओची ​​शूटिंग पूर्ण केले होते. सिनेमातील शाहरुखचे सर्व सीन्स स्वत: आमिर खानने शूट केले आहेत.

आमिर खान 'लालसिंग चड्ढा'चे दिग्दर्शन अव्दैत चंदन करतो आहे. मात्र, जेव्हा चित्रपटामध्ये शाहरुखचे चित्रीकरण करण्याची वेळ आली तेव्हा दिग्दर्शकाची टोपी आमिर स्वत: परिधान केली आणि शाहरुखचे सर्व सीन्स त्याने शूट केले. शूटिंग संपल्यानंतर दोघांनी एकत्र वेळ घालवला. त्यावेळी दिल्लीत शूटिंग सुरु होते. या चित्रपटात करीना कपूर खान आणि आमिर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. प्रेग्नेंन्सीमध्ये करिना कपूरने दिल्लीत सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे.  'लाल सिंग चड्ढा’ आहे हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल. आधी हा सिनेमा ख्रिसमसला रिलीज होणार होता मात्र कोरोना व्हायरसमुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. २०२१ मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :शाहरुख खानआमिर खान