Join us

Shah Rukh Khan : "माझ्या वाईट सवयी मी एकटाच..."; चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख खानचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 15:18 IST

Shah Rukh Khan : शाहरुख खानने या आनंदाच्या प्रसंगी त्याच्या चाहत्यांसाठी 'आस्क मी सेशन'चं आयोजन केलं होतं.

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने आपल्या शानदार अभिनय कारकिर्दीची 31 वर्षे पूर्ण केली आहेत. शाहरुखने बॉलिवूडमध्ये 31 वर्षे पूर्ण केल्याचा आनंद देखील व्यक्त केला आहे. दिवाना या चित्रपटातून त्याने पदार्पण केलं. या चित्रपटात त्याच्यासोबत दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीही होती. शाहरुख आणि दिव्याची जोडी लोकांना खूप आवडली होती. लोकांनी त्याचं कौतुक केलं होतं. 

शाहरुख खानने या आनंदाच्या प्रसंगी त्याच्या चाहत्यांसाठी 'आस्क मी सेशन'चं आयोजन केलं होतं. जिथे सुपरस्टारच्या चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. ज्याची उत्तरंही किंग खानने अतिशय मजेशीर दिली आहेत. सेशन सुरू करताना शाहरुखने लिहिलं, "वाह, दिवाना स्क्रीनवर हिट झाला त्याला आज 31 वर्षे झाली. खूप छान प्रवास झाला. सर्वांचे आभार आणि आता आम्ही 31 मिनिटांसाठी #AskSRK करू?"

शाहरुखच्या या पोस्टवर चाहत्यांनी खूप प्रश्न विचारायला सुरुवात केली. किंग खानच्या एका जबरा चाहत्याने दिवाना चित्रपटाच्या सेटवर कोणत्याही चांगल्या आठवणींबद्दल प्रश्न केला. उत्तर देताना शाहरुखने दिव्याजी आणि राजजी यांची नावे घेतली आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. दुसऱ्या चाहत्याने विचारलं की, इंडस्ट्रीतील एपिक एंट्रीबद्दल त्याला काय वाटतं आणि तो कसा विचार करतो. 31 वर्षांनंतरही तो सर्वांना क्रेझी करत आहे. 

शाहरुख यावर म्हणाला की, हेल्मेट घालायला हवे होते. सर्वात शेवटी, आणखी एका चाहत्याच्या प्रश्नाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या व्यक्तीने शाहरुख खानसोबत सिगारेट ओढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर किंग खानने माझ्या वाईट सवयी मी एकटाच करतो असं उत्तर दिलं. शाहरुख आपल्या चाहत्यांना कधीही चुकीच्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करत नाही. किंग खानवर लोकांचे प्रेम नेहमीच दिसून येते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूड