ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुरेश चटवाल यांचे दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. सब टीव्हीवरच्या 'एफआयआर' मालिकेतील भूमिकेमुळे ते घराघरांत पोहोचले होते.
शनिवारी रात्री सुरेश चटवाल यांचे निधन झा व काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली.
१९६९ साली त्यांनी चित्रपटसृष्टीत 'राखी राखी' चित्रपटातून पदार्पण केले व दोन दशकांहून अधिक कालावधीत ३० हून अधिक चित्रपटांत काम केले. 'अंजाम', 'करण अर्जुन', 'कोयला' व 'मुन्नाभाई एमबीबीबीएस' या चित्रपटातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या.