चित्रपटांतील नायिकांच्या साड्या, ड्रेस यांची वेगळीच क्रेझ असते. काही हौशी दिग्दर्शक तर नायिकेचे सौंदर्य दाखविण्यासाठी साड्यांची रास लावतात. ‘सिलसिला’ मधील रेखा असो की जया बच्चन, त्यांच्या साड्या फॅशन ट्रेंड बनतात. साड्यांचा पॅटर्न, नेसण्याची स्टाईल यामुळे अभिनेत्रींच्या नावाने साड्या ओळखल्या जातात. ‘चेन्नई एक्सप्रेस’मधील घरेलू दीपिका पदुकोन असो किंवा ‘सिंग इज किंग’ मध्ये साडी नेसून लाखो तरुणांना घायाळ करणारी कतरिना कैफ ही त्याची उदाहरणे. पण ‘शटर’ या मराठी चित्रपटात सोनाली कुलकर्णी संपूर्ण चित्रपटभर एकाच साडीमध्ये बघायला मिळते. सोनाली सांगते, शक्यतो चित्रपटात सतत वेगळा लूक, वेगळे डे्रस घालावे लागतात. त्याचा कित्येक दा कंटाळाही येतो. पण या चित्रपटात पूर्णवेळ एकाच साडीमध्ये दिसले आहे. सिक्वेन्सवाईज चित्रपटाचे शूटिंग झाल्यामुळे दरम्यानच्या काळात मळलेली साडी कधी धुतली सुद्धा नाही. यामुळेच चित्रपटाचा रॅपोही कायम ठेवता आला आणि त्यातील खरेपणा टिकून राहिला. नाहीतर ते सगळं खोट आहे, हे प्रेक्षकांना लगेच जाणवलं असतं.’’
संपूर्ण चित्रपटभर एका साडीवर
By admin | Updated: July 10, 2015 00:09 IST